ठळक बातम्या

अपंग असलेल्या वसंत संखे यांनी मिळविलेले यश इतरांसाठी वस्तूपाठ- देवेंद्र भुजबळ

मुंबई दि.१४ :- स्वत: अपंग असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश कसे मिळवायचे अन् ते कसे मिळविले याचा वस्तुपाठ वसंत संखे यांनी घालून दिला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या माहिती संचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांनी येथे केले. बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात भुजबळ यांच्या हस्ते संखे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.‌ त्यावेळी भुजबळ बोलत होते.

हे पुस्तक जरी अपंगांसाठी असले तरी या पुस्तकापासून सव्यगांनीही बोध घ्यावा. या पुस्तकाचा अन्य भाषेत अनुवाद होऊन तो प्रकाशित होणे ही काळाची गरज आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संखे यांनी भाषणातून जीवनपट उलगडला. यावेळी डाॅ.अरूण सावंत, संखे यांचे मित्र, संखे यांची नात यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अनेक अपंग, संखे यांचे नातेवाईक, मित्र मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गवाणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *