ठळक बातम्या

सिद्धिविनायक मंदिरातील श्रींच्या मूर्तीला १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत सिंदूर लेपन

भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही

मुंबई दि.१० :- श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरातील श्रीच्या मूर्तीला येत्या १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मुर्तींच्या दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

त्यामुळे त्या कालावधीमध्ये श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे. या सिंदूर लेपनानंतर १८ डिसेंबररोजी दुपारी एक वाजल्यापासून गाभाऱ्यातून भाविकांना श्रींच्या मूर्तींचे दर्शन घेता येईल,असेही या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *