मुंबईसह ठाण्यात रविवारी आणि सोमवारी हलक्या पावसाची शक्यता
मुंबई दि.१० :- तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीदरम्यान थडकणा-या ‘मंदौस’ या चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाण्यात रविवारी आणि सोमवारी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.
शनिवारपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता कमी होत त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. महाराष्ट्रात चक्रीवादळातील बाष्पामुळे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांतील ब-याचशा जिल्ह्यांना रविवारपासून यलो ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा तसेच मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आदी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.