राजकीय

महाविकास आघाडीचा येत्या १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

मुंबई दि०६ :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच सीमाप्रश्नी राज्य शासनाने मवाळ धोरण स्वीकारल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे येत्या १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.‌ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

विधिमंडळाचे आगामी नागपूर अधिवेशन, राज्यपालांकडून सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेले उद्योग, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न या विषयांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी झाली.‌ त्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला.

जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार असून अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस
अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, भाई जगताप, खासदार संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *