ठळक बातम्या

गुजरातमध्ये पुन्हा भाजपच मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज हिमाचलमध्ये चुरस

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि०६ :- गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठे बहुमत मिळवून सलग सातव्यांदा सत्तेवर येईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी सोमवारी वर्तवला. हिमाचल प्रदेशात मात्र सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होऊन भाजप काठावरच्या बहुमताद्वारे सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गुजरातमध्ये भाजपला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. ‘आप’ला ३ ते १३ जागांवर समाधान मानावे लागेल. हिमाचलमध्ये भाजपला २४ ते ४१, तर काँग्रेसला २४ ते ४० जागा तर ‘आप’ला ३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. या राज्यात विधानसभेच्या ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ हा आकडा गाठणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *