Sunday, July 12, 2026
Latest:
ठळक बातम्या

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद पोलिसांना श्रध्दांजली

राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट

नवी दिल्ली दि.३० :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देऊन प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली.

याप्रसंगी राज्यपालांना ‘सलामी गार्डस’ ने सलामी दिली. शहीद झालेल्या जवानांना मौन राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यपांलानी राष्ट्रीय पोलीस स्मारकाच्या केंद्रस्थानी असलेल्या मुख्य शिल्पाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केले.

येथे असलेल्या पोलीस संग्रहालयासही राज्यपांलानी भेट दिली. ज्या पोलीसांनी त्यांचे कार्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी येथे ‘शौर्य भिंत’ बांधण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *