मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी उद्यापासून – महाराष्ट्र सागरी मंडळाचा उपक्रम
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवा उद्यापासून (१ नोव्हेंबर) सुरू होणार असून मुंबई-मांडवादरम्यान २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेसाठी प्रवाशांना ४०० आणि ४५० रुपये मोजावे लागणार असून पूर्णतः वातानुकूलित टॅक्सीच्या दिवसाला ६ फेऱ्या होणार आहेत. या प्रवासाला अवघी ४० मिनिटे इतका वेळ लागणार आहे.
मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांना अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच
मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सध्या भाऊचा धक्का येथून रो रो सेवा सुरू आहे. रो रोने अलिबागला पोहचण्यासाठी ६० ते ७० मिनिटे लागतात. मात्र हा प्रवास आणखी जलद गतीने व्हावा यासाठी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला.
मुंबईसह राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ ला सुट्टी! – राज्यात थंडीचे आगमन
मुंबई क्रूझ टर्मिनल येथून सकाळी १०.३० वाजता, दुपारी १२.५० वाजता आणि दुपारी ३.१० वाजता तर मांडवा येथून दुपारी ११.४० वाजता, दुपारी २.०० वाजता आणि दुपारी ४.२० मिनिटांनी वॉटर टॅक्सी सुटणार आहे.
महाराष्ट्रात पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन