मुंबईची ‘दिल्ली’ झाली! हवेची गुणवत्ता ढासळली, धुलीकणांचे प्रमाण जास्त
मुंबई, दि. ७ राजधानी दिल्लीप्रमाणे मुंबईच्या हवेची अवस्था झाली असून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०९ असा नोंदविण्यात आला. राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांनुसार (एनएएक्यूएस) ३०९ हा गुणवत्ता निर्देशांक हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ असल्याचे सूचक आहे.
‘चतुरंग प्रतिष्ठान’चा जीवनगौरव’ पुरस्कार दुर्ग संशोधक आप्पा परब यांना जाहीर
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील तीन दिवसांच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ पातळीवर असल्याची नोंद झाली आहे.
भारतीय रिझर्व बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता?
मुंबईतील सुमारे सहा केंद्रांवर प्रति घनमीटरमध्ये अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (पी.एम. २.५) ३०० पेक्षाही अधिक असल्याची नोंद मंगळवारी झाली. माझगाव येथे हवेचा दर्जा सर्वात खालावलेला (३८५ एक्यूआय) असल्याचे नोंदवण्यात आले.सध्या दिल्लीमधील हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ३२९ असून हे प्रमाण मुंबईच्या तुलनेने २० ने कमी आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात कमालीचा बदल झाला. सध्या किमान आणि कमाल तापमान वाढले असले तरी समुद्री वाऱ्याची गती कमी आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगांकरिता उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्यामुळे धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे.
——