प्रजा फाउंडेशनच्या अहवालात महापालिका शाळांमधील शिक्षक ‘नापास’
७ शिक्षक निलंबित, १७९ शिक्षकांच्या विरोधात कारवाई
मुंबई, दि. ७ प्रजा फाऊंडेशन तर्फे बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केलेल्या एका अहवालात महापालिका शाळांमधील शिक्षक ‘नापास’झाले आहेत.
मुंबईची ‘दिल्ली’ झाली! हवेची गुणवत्ता ढासळली, धुलीकणांचे प्रमाण जास्त
गेल्या चार वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सात शिक्षकांना विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आले असून १७९ शिक्षकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ८७ शिक्षकांपैकी काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महाविकास आघाडीचा येत्या १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा
काही शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली तर सुमारे ९२ शिक्षकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रजा फाऊंडेशनने माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून मिळवलेल्या माहितीच्या आधाराने तयार केलेला अहवाल जाहीर केला.
———-