Saturday, July 11, 2026
Latest:
खेळ

जागतिक नेमबाजी स्पर्धा – सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना २ कोटी रुपये

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२१ :- जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख २ कोटी रुपये देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केले.

हेही वाचा :- मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड

राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केले.‌ राज्य मंत्रिमंडळानेही त्याच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.

हेही वाचा :- नेरळ- माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू

कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत रुद्रांक्षने वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्रांक्षच्या कामगिरीची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *