संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरचे प्रवेशद्वार रात्री ११ ते सकाळी ७ यावेळेत बंद राहणार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश
मुंबई दि.१४ :- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरचे प्रवेशद्वार रात्री ११ ते सकाळी ७ यावेळेत बंद करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभाग आणि पोलिसांना दिले. तसेच बेकायदा हाॅटेलवर ते बेकायदा असल्याचे फलक लावण्याचे आदेश ठाणे महापालिकेस दिले आहेत. गेल्याकाही वर्षांपासून येऊरमध्ये मोठ्याप्रमाणात बेकायदा हाॅटेल उभारण्यात आली आहेत.
योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्रग्रंथाचे येत्या १८ एप्रिलला प्रकाशन
येऊरचा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्यामुळे हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि शांतता क्षेत्र आहे. असे असतानाही रात्री अकरानंतर अनेक हाॅटेल्स बेकायदेशीरपणे सुरू असतात. या हाॅटेलमध्ये मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक वाजविले जातात. तसेच हाॅटेलमध्ये रात्रभर प्रखर उजेड असतो. त्यामुळे निशाचर प्राणी, पक्षी गायब झाल्याचा दावा येथील आदिवासी रहिवाशांकडून केला जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘मनसे’तर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
तसेच येथील रहिवाशांनाही बाहेरून पर्यटकांच्या वाहनांचा त्रास सहन करावा लागत होता. येऊर येथील आदिवासींनी वनहक्क समितीच्या माध्यमातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही दिवसांपूर्वीच ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि उपरोक्त आदेश दिले.