योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्रग्रंथाचे येत्या १८ एप्रिलला प्रकाशन
ठाणे दि.१४ :- प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन येत्या १८ एप्रिलरोजी ठाणे येथे होणार आहे. ‘ग्रंथाली’ने हा ग्रंथ प्रकाशित केला असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘मनसे’तर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संध्याकाळी पाच वाजता होणा-या या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार तातडीने हटविण्याची मागणी
‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, जडणघडण, संघर्ष, कष्ट, राज्याच्या विकासातील योगदान याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडण्यात आला आहे,