शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा
दोनशेहून अधिक शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
डोंबिवली दि.०२ :- शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी डोंबिवलीतील काही संस्थांतर्फे शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
राज्यात उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
डोंबिवलीतील क.डों.म.पा. सावळाराम क्रीडासंकुलात ही स्पर्धा पार पडली. कल्याण डोंबिवली महापालिका, पर्यावरण दक्षता मंडळ, रोटरी क्लब डोंबिवली वेस्ट, लक्ष्मी नारायण संस्था, इनरव्हील डोंबिवली पश्चिम आणि पूर्व यांच्या सहकार्याने मंगळवारी हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
महापालिका तसेच डोंबिवलीतील इतर शाळांमधील दोनशेहून अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. मूर्तिकार सचिन गोडांबे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्कृष्ट मूर्ती तयार केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.