* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

मुंबई दि.०२ :- प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ५८ वर्षांचे होते. देसाई यांच्या आत्महत्येमुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. देसाई यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर स्टुडिओतील कर्मचाऱ्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानप्रवास सुविधा – रविंद्र चव्हाण

पोलीस पुढील तपास करत आहेत. देसाई यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून ते स्टुडीओमध्येच होते. अगदी कालपर्यंत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली, आगामी प्रकल्पांची माहिती दिली होती. आज सकाळपासूनच त्यांनी कोणाचाही दूरध्वनी घेतला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडीओच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळविले.

राज्यपालांच्या हस्ते डिजिटल ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकाचे प्रकाशन

‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या चित्रपटांचे तसेच तमस, चाणक्य या मालिकांचे, राजकीय सभा, संमेलने, पुरस्कार वितरण सोहळे याचे कला दिग्दर्शन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *