राज्यात उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत बुधवार, गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार
मुंबई दि.०२ :- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात उद्यापासून (बुधवार) तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. रायगड, रत्नागिरीला बुधवार, गुरुवारसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
रायगड आणि रत्नागिरीत या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात मात्र गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात शुक्रवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानप्रवास सुविधा – रविंद्र चव्हाण
पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरालाही बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट आहे. या दोन दिवशी पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचे सातत्य कायम असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.