संसदेचे हिवाळी अधिवेशन निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२३ :- संसदेचे हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झाले. ७ डिसेंबरला सुरू झालेले हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होते.
सकाळी सभागृह सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. समारोपाच्या भाषणात त्यांनी सांगितलं की या अधिवेशनात एकूण १३ बैठका झाल्या. ६८ तास ४२ मिनिटे कामकाज चाललं. सभागृहात ९ विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी ७ विधेयकं मंजूर झाली.
राज्यसभेचे कामकाजही आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. राज्यसभेने या अधिवेशनात ९ विधेयके मंजूर केली. ३१ खाजगी विधेयकेही सभागृहात मांडण्यात आली. गोंधळामुळे सभागृहाचा १ तास ४६ मिनिटांचा वेळ वाया गेला, असे राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितले.