वाहनांच्या पासिंगचे नियम अधिक कठोर करणार- शंभुराजे देसाई
नागपूर दि.२३ :- प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कठोर करण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत दिली.
नाशिक – औरंगाबाद मार्गावर काही महिन्यांपूर्वी खासगी बसला झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दा आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केला होता.