* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> कल्याण ,डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

कल्याण ,डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद

कल्याण दि.०५ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे उद्या ( ६ ऑक्टोबर) कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.‌ नागरीकांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.‌

भविष्य निर्वाह निधीच्या रकमेसाठी आंदोलनाचा इशारा

महापालिकेच्या १५० द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली ज.शु.के.) व १०० द.ल.ली. मोहिली जलशुध्दीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मार्फत वीज पुरवठा केला जातो. सबस्टेशनमधील सदर फीडारच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी संवाद साधणार

या कामामुळे महापालिकेच्या १५० द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली ज.शु.कें.) व १०० द.ल.ली. मोहिली जलशुध्दीकरण केंद्रामधून कल्याण ग्रामीण विभाग (टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) व डोंबिवली (पूर्व व पश्चिम) तसेच कल्याण पश्चिम विभागामधील भोईरवाडी, रामबाग, चिकणघर, घोलपनग, मिलींदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड व कल्याण स्टेशन परिसर या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *