दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ परिसरात एक दिवस पाणीपुरवठा बंद

मुंबई दि.२६ :- दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, परळ परिसरात उद्या (शनिवारी) सकाळी ८ ते रविवारी, २८ मे सकाळी १० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात २८ मे रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.

मुंबई विद्यापीठात जागांच्या तुलनेत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी – वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी स्पर्धा

संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात २७ मे रोजी दुपारी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.

रेल्वे स्थानके, टर्मिनसवर नऊ कंपन्यांच्या बाटलीबंद पाणी विक्रीला परवानगी; मध्य रेल्वेचा निर्णय

डिलाईल रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.

सिद्धार्थ विहार वसतिगृहाची नव्याने उभारणी; सामाजिक न्याय विभागाकडून ७८ कोटींची तरतूद

गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणीकपात घेऊन त्यानंतर नेमकी गळती शोधून दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल. सध्या गळती शोधण्यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका जलअभियंता विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.