मुंबई विद्यापीठात जागांच्या तुलनेत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी – वाणिज्य शाखेत प्रवेशासाठी स्पर्धा

मुंबई दि.२६ :- मुंबई विद्यापीठातील प्रथम वर्षांच्या जागांच्या तुलनेत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. मुंबई विभागातून २ लाख ९० हजार २५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यापीठातील प्रवेशासाठी ३ लाख ८६ हजार जागा आहेत.

रेल्वे स्थानके, टर्मिनसवर नऊ कंपन्यांच्या बाटलीबंद पाणी विक्रीला परवानगी; मध्य रेल्वेचा निर्णय

एकूण जागांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी नामांकित महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा राहणार आहे.

सिद्धार्थ विहार वसतिगृहाची नव्याने उभारणी; सामाजिक न्याय विभागाकडून ७८ कोटींची तरतूद

मुंबई विद्यापीठात वाणिज्य विभागात १ लाख ५० हजारांहून अधिक जागा असून मुंबई विभागात या शाखेत १ लाख ५१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य मंडळाचे विद्यार्थीही प्रवेशाच्या स्पर्धेत सहभागी असतील. त्यामुळे वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी ही स्पर्धा अधिक जास्त राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.