सिद्धार्थ विहार वसतिगृहाची नव्याने उभारणी; सामाजिक न्याय विभागाकडून ७८ कोटींची तरतूद
मुंबई दि.२६ :- आंबेडकरी चळवळीच्या अनेक स्थित्यंतराचे ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतिगृहाची नव्याने उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर मे महिन्यात वातानुकूलित लोकलने दररोज ५८ हजार प्रवाशांचा प्रवास
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
गुणवत्ता वाढीसाठी विशेष कृती आराखडा – यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी
सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सहसचिव दिनेश डिंगळे आणि इतर शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वसतिगृहातून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी या वसतीगृहात वर्किंग मेन हॉस्टेल म्हणून २० खोल्या आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. नऊ मजल्यांच्या या वसतिगृहात ध्यानधारणा करण्यासाठी सभागृह असणार आहे.