राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने देशातील राजकारणाची दिशा बदलली – नाना पटोले
कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुंबई दि.१३ :- राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालात पाहायला मिळाले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे भाजपचा धुव्वा उडेल, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केला.
माजी नगरसेवक मनोज संसारे यांचे निधन
कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या भ्रष्ट सरकारला पराभूत करून काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. काँग्रेस पक्षाने महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार या जनतेसाठी महत्वाच्या असणा-या प्रश्नांवर निवडणूक लढविली. भारतीय जनता पक्षाने मात्र नेहमीप्रमाणे धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेतला, अशी टीका पटोले यांनी केली.
‘सीटबेल्ट अलार्म’ बंद करणा-या उपकरणाची विक्री, जाहिरात बंद करण्याचा आदेश
दरम्यान कर्नाटकमधील विजयाचा जल्लोष काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभर साजरा केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला.