ठळक बातम्या

मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा ‘मावळा-टिबीएम’ यंत्राने पूर्ण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभियंते, कामगारांचे अभिनंदन

मुंबई दि.३० :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टिबीएम यंत्राने पूर्ण केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्वपूर्ण भर पडेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगावं चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणन्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला.

अमरावती येथील ८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, तसेच एल अँण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टिबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, याठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांनीही बृहन्मुंबई महापालिका आणि प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कंपन्या, सल्लागार तसेच अभियंते, कर्मचारी, कामगारांचे अभिनंदन केले.

मेट्रो २ अ व मेट्रो ७ मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५ लाख रुपयापर्यंतचे विमा कवच

मुंबईसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून देशातील अशा प्रकारचा पहिलाच बोगदा आपण पूर्ण केला आहे. हा प्रकल्प आणि त्यातील बोगदा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत. समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी विविध सुविधाही अत्याधुनिक असतील. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी स्थानिक कोळीवाड्यातील भुमिपुत्रांनाही विश्वासात घेतले आहे. समुद्रातील दोन खांबामधील अंतरही त्यादृष्टीने १२० मीटर्सचे केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पातीहा हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले.

या प्रकल्पाची काही ठळक वैशिष्ठ्ये

-दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी.
– प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल से वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.
– या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह यांचा समावेश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *