मेट्रो २ अ व मेट्रो ७ मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५ लाख रुपयापर्यंतचे विमा कवच
मुंबई दि.३० :- मेट्रो २ अ व मेट्रो ७ मधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना आता ५ लाख रुपयापर्यंतचे विमा कवच मिळणार आहे. मेट्रो स्थानकाची इमारत, फलाट, स्थानक परिसरात काही दूर्घटना झाले तर हे विमाकवच प्रवाशांना मिळणार आहे. मेट्रो स्थानक इमारतीच्या बाहेर दुर्घटना झाली तर विमा योजनेचे संरक्षण मिळणार नाही.
एसटीच्या चालक वाहकांना पुरेशा विश्रांतीसाठी वातानुकूलित विश्रांती गृह बांधण्यात येणार
दुर्घटनाग्रस्त प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला कमाल १ लाख रुपये, बाह्यरुग्णांसाठी १० हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई, किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत कमाल ९० हजार रुपये, कायमचे किंवा आंशिक अपंगत्व आल्यास ४ लाख रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये असे विमा कवच असणार आहे. या विमा संरक्षण कवचाचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे वैध तिकीट, पास, स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड, वैध परवानगी असणे आवश्यक आहे.
