Skip to content
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेची मागणी
डोंबिवली दि.२२ :- सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची दुचाकी वाहने नाट्यगृहाच्या आवारात उभी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नाट्यगृहाच्या आवारात चारचाकी वाहने उभी करण्यासाठी परवानगी आहे, तशीच परवानगी प्रेक्षकांच्या दुचाकी वाहनांना मिळावी. ही वाहने रस्त्यावर उभी करावी लागल्याने भुरट्या चोरांकडून वाहनांचे सुटे भाग, आरसे काढून नेले जातात. काही वेळा वाहनांची चोरी झाल्याचे प्रकारही घडले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.