भटक्या – विमुक्त समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.०३ :- भटक्या व विमुक्त समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे सांगितले. भटक्या- विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
महाविद्यालयात बुरखा घालून येण्यास बंदी घातल्याने चेंबूरमध्ये तणाव
भटके- विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींकडून विविध प्रश्न मांडण्यात आले. यात शैक्षणिक प्रश्न, घरांची उपलब्धता यासह भटके- विमुक्त समाजातील लोककलावंतांच्या अडचणींची माहिती देण्यात आली.
बृहन्मुंबई महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात आतापर्यंत ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण
लोककला जोपासणाऱ्या लोककलावंताना राज्य शासनाकडून देण्यात येणारे मानधन पाच हजार रुपये करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.