ठळक बातम्या

बृहन्मुंबई महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात आतापर्यंत ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण

मुंबई दि.०२ :- बोरिवली (पूर्व) येथील बृहन्मुंबई महापालिकेच्या थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात आत्तापर्यंत ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यात आले बोनमॅरो प्रत्यारोपणामुळे थॅलेसेमिया रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांमध्ये योग्य त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार होत नसल्याने त्यांना नियमितपणे रक्त देण्याची गरज असते.

यशस्वी जीवनासाठी सात्त्विक जीवनशैली आवश्यक – शॉन क्लार्क

मात्र, या रूग्णांना अनुरूप बोनमॅरोचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आल्याने या बालकांचे शरीर आवश्यक त्या प्रमाणात लाल रक्त पेशी तयार करू लागते, अशी माहिती उपचार केंद्राच्या संचालिका डॉ. ममता मंगलानी यांनी दिली रक्ताचा कर्करोग म्हणजे लुकेमीया आणि अन्य कर्करोगांसाठी देखील या केंद्रात बोनमॅरो प्रत्यारोपण व इतर संबंधित उपचार केले जातात.

शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा

गेल्या पाच वर्षात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक बालकांवर विविध स्तरीय उपचार करण्यात आले आहेत, असेही डॉ. मंगलानी यांनी सांगितले. बोनमॅरो अनुरुप असल्याची चाचणी सकारात्मक आल्यानंतर बोनमॅरो प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रूग्णालयात २५ ते ४० लाख रूपये शुल्क घेतले जाते, मात्र महापालिकेच्या सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्रात ही सुविधा निःशुल्क आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *