महाविद्यालयात बुरखा घालून येण्यास बंदी घातल्याने चेंबूरमध्ये तणाव
मुंबई दि.०२ :- चेंबूरच्या एनजी आचार्य आणि डिके मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींना गणवेशावर बुरखा घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काही विद्यार्थी संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. त्यामुळे आज येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात आतापर्यंत ३०० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण
पोलीस प्रशासनाच्या मदतीने आता विद्यार्थ्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गणवेश घालून आम्ही येऊ पण त्यावर बुरखा घालू आणि महाविद्यालयात बुरखा काढण्यास जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी मुस्लिम विद्यार्थ्यांनी केली आहे. तर महाविद्यालयात प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांनी गणेवेशातच आत यावे , बुरख्यात नाही अशी महाविद्यालयाची भूमिका आहे.