प्रीमियम वातानुकूलित बससेवेमुळे ‘बेस्ट’ला तीन कोटी रुपयांचे उत्पन्न
मुंबई दि.१४ :- भ्रमणध्वनी ॲपआधारित आसन आरक्षित करणाऱ्या बेस्टच्या प्रीमियम वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या सहा महिन्यांत तीन लाखांहून अधिक प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला आहे. या प्रिमियम वातानुकूलित बसमुळे बेस्टला तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
बंद पडलेल्या ‘इरॉस’ चित्रपटगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू; नूतनीकरणानंतर ‘आयमॅक्स’ या नावाने नवी ओळख
वातानुकूलित आणि विजेवर धावणारी प्रीमियम बससेवा ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल आणि वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानकदरम्यान १२ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. ‘चलो मोबाइल ॲप’द्वारे बसमधील आसन आरक्षित करता येते.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा दूर्घटना; चौकशी समितीस एक महिन्याची मुदत वाढ
या बसचा मार्ग, अपेक्षित वेळ, त्या मार्गावर आणखी किती बससेवा असतील, याची माहितीही ॲपवर समजते. सध्या ९६ प्रीमियम बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. दररोज सुमारे तीन हजार प्रवासी प्रीमियम बसमधून प्रवास करत आहेत.