‘आयटीआय’ कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये

मुंबई दि.१६ :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कंत्राटी निदेशकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. हे मानधन २५ हजार रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

कोयनानगर येथे महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागा

या निर्णयाचा फायदा २९७ कंत्राटी निदेशकांना होणार आहे.‌ यापूर्वी त्यांना १५ हजार रुपये मानधन मिळायचे. राज्यातील महापालिका क्षेत्रातील आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित आयटीआयमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट २०१० पासून सुरु करण्यासाठी एकूण १५०० शिक्षकीय पदांना २०१० मध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार

वाढती महागाई आणि त्यांचा दीर्घ अनुभव लक्षात घेऊन ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षांनी या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सेवा पुढे ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.