वैद्यकीय व्यवसाय स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती जोपासावी- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे
मुंबई दि.०९ :- समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, हे सतत लक्षात ठेवून समाजाकडे चौकस बुद्धीने पाहिले पाहिजेत. येणाऱ्या आव्हानांचा सामना करत आणि धीरोदात्तपणे प्रत्येक संकटाला तोंड देत विद्यार्थ्यांनी आपली सेवाभावी वृत्ती जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पुढाकारने ‘उत्सव महाराष्ट्राच्या परंपरेचा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘श्रावणसरी’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘माझी माती, माझा देश’ अभियानातून ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत डॉ. शुभम हिरेमठ आणि विद्यार्थीनी भक्ती शिंदे यांनी घेतली. त्यावेळी डॉ. आमटे बोलत होते. वैद्यकीय सेवा अत्यंत अत्यावश्यक सेवा असून वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा द्यावी, असे आवाहनही डॉ. आमटे यांनी केले.
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना पंचप्रण प्रतिज्ञा
या उत्सवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र धामणे, आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांचीही व्याख्याने झाली. दोन दिवसांच्या कार्यक्रमात दिंडीसह शोभायात्रा काढण्यात आली. गायन, नृत्य व नाट्य स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. बा. य. ल नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या ३८ वर्षांपासून ‘श्रावणसरी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमादरम्यान दोन दिवसांमध्ये आहार देखील मराठी पद्धतीचा ठेवण्यात येतो.