‘माझी माती, माझा देश’ अभियानातून ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.०९ :- देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचे अमृतक्षण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ सांगतेच्या निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण या मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
टिळकनगर बाल मंदिराच्या ‘अमृतपुत्र’ गौरव समारंभात ४३ विद्यार्थ्यांचा गौरव
त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आदी यावेळी उपस्थित होते. महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’चा नारा येथूनच दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अशा अगणित हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना पंचप्रण प्रतिज्ञा
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना सांस्कृतिक कार्य विभागाने आगळेवेगळे कार्यक्रम आयोजित केले. देशात आपल्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली या विभागाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात राज्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांचीही भाषणे यावेळी झाली. महापालिका आयुक्त चहल यांनी प्रास्ताविक केले.