मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना पंचप्रण प्रतिज्ञा
मुंबई दि.०९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील अधिकारी- कर्मचा-यांना ‘पंचप्रण’ शपथ दिली. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानांतर्गत मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव मनोज सौनिक, ‘माझी माती माझा देश’ अभियानाचे नोडल अधिकारी (ग्रामीण) एकनाथ डवले आणि नोडल अधिकारी (शहरी) गोविंद राज आणि मंत्रालयातील प्रशासकीय व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
चित्रपट, रंगभूमी महामंडळाकडून १ कोटी ३४ लाख रुपयांचा लाभांश शासनाला सुपूर्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय टपाल विभागाने तयार केलेल्या शहाजीराजे भोसले यांच्या विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. येत्य १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांना कापडी तिरंगा ध्वज देऊन करण्यात आली.
ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते हरी नरके यांचे निधन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणाऱ्या तीन उद्घोषणा वर्षभर मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता प्रसारित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाची सुरुवातही आजपासून मंत्रालयात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यमंत्री कार्यालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले असून हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाची माहिती दिली.