यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक
पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती तयार करण्यासाठी प्रत्येक विभागात एक जागा मोफत उपलब्ध करुन देण्याची सूचना
मुंबई दि.१८ :- गणेशोत्सवात घरगुती स्तरावरील गणेशोत्सवासाठी चार फूट पर्यंत उंची असणा-या मूर्ती केवळ शाडू माती आणि पर्यावरणपूरक घटकांपासून घडविलेल्या असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात येणा-या मूर्तींवर घरगुती गणेशोत्सवासाठी प्रतिबंध आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज येथे एका विशेष बैठकीत दिली.
बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तीकारांना मोफत उपलब्ध करुन द्यावी, या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने प्रायोगिक स्तरावर काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना परिमंडळीय उपायुक्तांना देण्यात आल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.
२०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील : राजदूत एरिक गारसेटी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठी आकारले जाणारे शुल्क व अनामत रक्कम माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तसेच गेल्यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान ज्या गणेशोत्सव मंडळांची शुल्क व अनामत रक्कम जमा असेल, त्यांना ती पुढील ७ दिवसांच्या आत परत करण्याची सूचनाही या बैठकीत केली. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या विशेष बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आदि उपस्थित होते.