पश्चिम रेल्वेवरील चौथे टर्मिनस जोगेश्वरी येथे – टर्मिनस उभारणीत १३ कंत्राटदारांचा सहभाग
मुंबई दि.२५ :- पश्चिम रेल्वेवरील चौथे आणि मुंबईतील सहावे रेल्वे टर्मिनस जोगेश्वरी येथे उभारण्यात येणार असून या कामासाठी पश्चिम रेल्वेने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. जोगेश्वरी टर्मिनस उभारणीत १३ कंत्राटदारांचा सहभाग असणार आहे. टर्मिनस बांधकाम आणि विद्युतीकरण अशा दोन टप्प्यांत जोगेश्वरी टर्मिनसची उभारणी केली जाणार आहे.
सावरकर स्मारकात रविवारी ‘शतजन्म शोधिताना’
रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असून पुढील वर्षी जून महिन्यात हे टर्मिनस रेल्वे वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. टर्मिनस उभारण्यासाठी ७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे ५०० मीटर आहे.
‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चा रविवारी समारोप – सावरकर जयंतीनिमित्त दादर येथे भव्य पदयात्रा
राम मंदिरच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणी जोगेश्वरी टर्मिनसला देण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेवर भारतात तयार झालेल्या ८ आणि १६ डब्यांच्या वंदे भारत गाड्या सध्या धावत आहेत. भविष्यात शयनयान वंदे भारत चालविण्याचे नियोजन आहे. या गाड्यांची वाहतूक आणि त्या उभ्या करण्यासाठी नव्या जोगेश्वरी टर्मिनसमध्ये व्यवस्था केली जाणार आहे.