राजकीय

शिवसेना आणि उबाठा गटाच्या सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस

मुंबई, दि. ८
शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सर्व आमदारांना नोटीस बजावली आहे.

उबाठा गटाला आणखी एक धक्का विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिवसेनेत दाखल

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपविली. शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन निर्णय घेऊ असे नार्वेकर यांनी सांगितले होते. नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही प्रत त्यांना पाठवली आहे.

पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत- पंकजा मुंडे

शिवसेना पक्ष आणि उबाठा गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या १४ आमदारांना ही नोटीस पाठविली आहे.

मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव उबाठा गटाला देण्यात आलेला नाही- संदीप देशपांडे

शिवसेनच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आला आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *