‘हवामानपूरक प्रकल्पांची रचना’ या विषयावरील कार्यशाळेचा महापालिका मुख्यालयात समारोप
मुंबई दि.२१ :- नैसर्गीक आपत्तींचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून याची माहिती संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून देण्यात आली. ‘दक्षिण आशियातील शहरांमध्ये हवामानपूरक प्रकल्पांची रचना करणे आणि त्यासाठी वित्तपुरवठा वाढविणे’ या विषयावर दोन दिवसांची विशेष कार्यशाळा नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आली होती.
विक्रोळी आणि भांडुप भागातील डोंगर उतारावर दरड कोसळण्याचा धोका; रहिवाशांना स्थलांतराचे आवाहन
कार्यशाळेत विविध देशांतील महापालिका, तसेच भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या समारोप बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात झाला. बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, ‘एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपेसिटी बिल्डिंग अँड रिसर्च’चे महासंचालक डॉ. रमानाथ झा, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स’ या संस्थेचे संचालक डॉ. हितेश वैद्य आदि यावेळी उपस्थित होते.
एकविरा देवी संदर्भात समाज माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित
‘एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपेसिटी बिल्डिंग अँड रिसर्च’ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स यांच्यादरम्यान वातावरण क्षमता प्रशिक्षण उपक्रमासंदर्भात करारही करण्यात आला.