मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
मुंबई दि.२५ :- मुंबई आणि उपनगरांतील नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळणार आहे. पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना दर्जेदार बि- बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे- मुख्यमंत्री शिंदे
गेल्या काही दिवसांपासून वाढलेले तापमान आणि आद्रता यांमुळे मुंबई आणि परिसरात उकाडा जाणवत होता. मात्र आता काही प्रमाणात उकाडा कमी होण्याची शक्यता आहे.
भाजयुमो’तर्फे कल्याण येथे काँग्रेसचा निषेध
मुंबई आणि परिसरात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी घट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.