भाजयुमो’तर्फे कल्याण येथे काँग्रेसचा निषेध
राहुल गांधी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना
कल्याण, दि. २५
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असून राहुल गांधी यांसोबत तुलना होऊच शकत नाही असे असताना देखील काँग्रेस पक्षाने हा खोडसाळपणा केला.
कल्याण पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सदर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपा कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई, मंडल अध्यक्ष विनोद मुथा, अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यावेळी उपस्थित होते.
—–
