ठळक बातम्या

देश अन् धर्म वाचविण्याविषयी हिंदू बोलत असतील तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? अधिवक्ता सुभाष झा

मुंबई दि.२९ :- भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, आपला देश आणि धर्म वाचविण्याविषयी हिंदू बोलत असतील, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते सुभाष झा यांनी उपस्थित केला. हिंदू जनजागृती समिती आयोजित ‘हेट स्पीच’ की हिंदूंना लक्ष्य करण्याचे साम्यवादी षडयंत्र ?’या विषयावरील दूरदृश्य प्रणाली संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या देशात हिंदूंविरोधात अनेक राजकीय नेते आणि हिंदूविरोधी लोक नियमितपणे ‘हेट स्पीच’ करत आहेत, त्याविषयी कोणत्याही न्यायालयात अर्ज दाखल केला जात नाही.

आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘हेट स्पीच’ म्हणजे काय ?’ याची व्याख्या सुस्पष्ट होणे आवश्यक आहे. सध्या न्यायाधीश निर्णय देतांना कायदे बनवायला लागले आहेत. कायदे बनवणे, हे न्यायाधीशांचे काम नसून ते संसदेचे काम आहे, असेही झा यांनी सांगितले. भारतात हिंदू आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहेत. गेल्या काही दशकांत निर्माण झालेले अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार, पाकिस्तान आदी देश भारतापासून तोडण्यात आले. यातील अनेक इस्लामी राष्ट्रे झाली. सध्या भारताचे इस्लामीकरण करण्याचा प्रयोग चालू आहे. या देशाचे पुन्हा अनेक तुकडे करून देशाचे विभाजन केले जाईल, या धोक्याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे.

केंद्रातील भाजप सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी पी. चिदंम्बरम

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले नाही, तर भारताचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही, याकडेही झा यांनी लक्ष वेधले. अमेरिकेमध्ये ‘इस्लामोफोबिया’विषयी कायदा करण्यात आला आहे. भारतात असा कायदा करता येणार नाही, म्हणून ‘हेट स्पीच’ ही पुढील आवृत्ती आणली आहे. हिंदूंच्या विविध सभांमधून हिंदूंमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे जिहादी अस्थिर झाले आहेत. हिंदूंच्या सभांत बोलणारे वक्ते, आयोजक यांच्याविरोधात तक्रारी दाखल करून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात आहे, असे ‘सुदर्शन चॅनल’चे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी – रवींद्र चव्हाण

२००८ पासून दरवर्षी जळगावमध्ये आम्ही हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेऊन जनजागृती करत आहोत.पण २५ डिसेंबर २०२२ या दिवशी सभा घेतल्यावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही घटना घडली नाही. तरीही प्रशासनावर दबाव आणून ९ मे २०२३ या दिवशी हिंदूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २०१२ मध्ये मुंबईत रझा अकादमीने सभा घेऊन दंगल घडविली; मात्र वक्त्यांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. जळगावमध्ये काही झालेले नसतांना हिंदूंवर ‘हेट स्पीच’चे गुन्हे दाखल होतात, हे मोठे षड्यंत्र असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *