ठाणे ते बोरिवली प्रस्तावित भूमिगत मार्ग; निविदेसंदर्भात आक्षेप घेणारी एल. ॲण्ड टी.ची याचिका फेटाळली

मुंबई दि.०५ :- ठाणे ते बोरिवली प्रस्तावित भूमिगत मार्गाच्या निविदेसंदर्भात आक्षेप घेणारी एल. ॲण्ड टी.ची याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचे कंत्राट मेघा इंजिनियरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनीला देण्यात येणार आहे.

बारसू प्रकल्पविरोधी आंदोलन; गावबंदी आणि समाजमाध्यमांवर विरोधी लेखनास मनाई करणारा आदेश मागे

ठाणे ते बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ११.८ कीलोमीटर लांबीचा ठाणे – बोरिवली भूमिगत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. या मार्गाचे तीन टप्प्यात काम करण्याचे निश्चित करण्यात आले.  या कामासाठी एल. ॲण्ड टी. आणि मेघा इंजिनियरींग या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या.

कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा दर सोमवार, मंगळवारी २४ तास बंद

छाननीअंती एल. ॲण्ड टी.ची निविदा काही कारणास्तव अपात्र ठरली. मात्र एल. ॲण्ड टी.ने याला आक्षेप घेत थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुरुवारी एल. ॲण्ड टी.ची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता निविदा प्रक्रियेला अंतिम रूप देण्याच्या आणि पुढील कामाला सुरुवात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.