कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा दर सोमवार, मंगळवारी २४ तास बंद
पावसाळ्यापर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन
कल्याण दि.०५ :- पुरेसा पाऊस पडेपर्यंत बारवी धरणातील पाणी साठा शिल्लक राहावा यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने शासन आदेशानुसार कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा सोमवार, आणि मंगळवार या दोन दिवशी २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका ३०० कोटी रुपये खर्च करणार
सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ या कालावधीत कल्याण डोंबिवली महापालिकेला विविध जलस्त्रोतांमधून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
उल्हास नदीवरील बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम, शहाड, वडवली, टिटवाळा, मांडा, आंबिवली, डोंबिवलीला नेतिवली केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई आसपास
कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा दर सोमवार, मंगळवारी २४ तास बंद