दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे सादरीकरण
मुंबई दि.०२ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि नृत्य यासाठी विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ६ मे आणि रविवार दिनांक ७ मे या दिवशी आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
यात सहभागी गायकांना तबला साथ प्रवीण करकरे यांचे शिष्य आणि केंद्राचे शिष्यवृत्तीधारक यज्ञेश कदम आणि निनाद कुणकवळेकर करणार असून संवादिनी साथ ओंकार अग्निहोत्री आणि शुभदा गायकवाड करणार आहेत.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा संगीत नाट्य महोत्सव साजरा
शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी १० ते १.३० या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य (गुरु – स्नेहल कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितुत – गायन (गुरु – वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर), अदिती पोटे – गायन – (गुरु – अपूर्वा गोखले) हे कला सादर करणार आहेत.
राष्ट्रीय अध्यक्षक्षपद सोडण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयानंतर उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना धक्का
रविवार दिनांक ७ मे संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमात सावनी पारेकर – ख्याल गायन (गुरु – पल्लवी जोशी), आर्या धारेश्वर – गायन (गुरु – यशस्वी सरपोतदार), प्राजक्ता शेंद्रे – गायन (गुरु – श्रीमती पल्लवी जोशी), सावनी गोगटे – गायन – गुरु (पं. शुभदा पराडकर) सादरीकरण करणार आहेत.