राष्ट्रीय अध्यक्षक्षपद सोडण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयानंतर उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना धक्का

निर्णय मागे घेण्यासाठी नेते, कार्यकर्ते यांची मनधरणी
दीड तासांनंतर शरद पवार घरी जाण्यासाठी निघाले

मुंबई दि.०२ :- प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज येथे जाहीर केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांनी लिहिलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवार बोलत होते. सार्वजनीक जीवनात १ मे १९६० पासून सुरू झालेला हा संपुर्ण प्रवास गेली ६३ वर्षे अविरत चालू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे.

येत्या शुक्रवारी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार

संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर राहणार नसलो तरी शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे, असेही पवार म्हणाले. दरम्यान शरद पवार यांच्या या घोषणेनंतर सभागृहात उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्ते या सर्वांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

शरद पवार आपला निर्णय जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहातून हलणार नाही, अशी भूमिका उपस्थित कार्यकर्त्यांनी घेतली आणि ते सभागृहाच ठाण मांडून बसले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला आणि पवार यांना विश्रांती घ्यायची आहे, त्यांना इथून घरी जाऊ दे अशी विनंती केली. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सुमारे दीड तास त्यांनी सर्व नेते आणि शरद पवार यांना एका जागी अडकून ठेवले. अखेर शेवटी अजित पवार यांनी पुन्हा एकदा आम्हाला इथून जाऊ दे असे पुन्हा एकदा आवाहन केले आणि शरद पवार सभागृहातून बाहेर पडले. पवार सभागृहातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पवार यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत रस्ता मोकळा केला.

Leave a Reply

Your email address will not be published.