दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा संगीत नाट्य महोत्सव साजरा
संगीत शारदा, संगीत स्वयंवर,संगीत मदनाची मंजिरी सादर
मुंबई दि.०२ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या संगीत नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना मराठी मनाच्या मर्मबंधातील ठेव असलेल्या संगीत रंगभूमीचा वैभवशाली कालखंड अनुभवता आला. या नाट्य महोत्सवात संगीत शारदा, संगीत स्वयंवर आणि संगीत मदनाची मंजिरी ही संगीत नाटके सादर झाली.
राष्ट्रीय अध्यक्षक्षपद सोडण्याच्या शरद पवार यांच्या निर्णयानंतर उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना धक्का
गोविंद बल्लाळ देवल यांचं ‘संगीत शारदा’ हे नाटक पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेने सादर केले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित पुणे येथील कलाद्वयी संस्थेने सादर केलेले “संगीत स्वयंवर’ हे नाटक बालगंधर्व यांचे नाटक म्हणून ओळखले जाते. “नाथ हा माझा, मोही मना’, “मम आत्मा गमला, एकला नयनाला’, “मम कृष्ण सखा रमा’ या पदांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
येत्या शुक्रवारी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार
पुणॆ येथील कलाद्वयी या संस्थेने सादर केलेल्या विद्याधर गोखले लिखित संगीत ‘मदनाची मंजिरी’ या नाटकाने महोत्सवाचा समारोप झाला. विद्याधर गोखले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांचे नाटक सादर करून संस्थेने त्यांना स्मरणांजली वाहिली.