दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद
मुंबई दि.०९ :- कोकणातील परशुराम घाटात दरड कोसळल्याने परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटात वाहनांची लांबच-लांब रांग लागली असून परशुराम घाटातील वाहतूक चिपळूण-लोटे-चिरणी-कळंबस्ते मार्गाने वळविण्यात आली आहे.
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन
सोमवारी रात्रीपासून परशुराम घाट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरड हटवेपर्यंत परशुराम घाटातील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून परशुराम घाटाच्या रुंदीकरणाचे सुरू आहे. त्यामुळे आठवडाभर हा घाट दिवसा पाच तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत होता.
बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्या काँग्रेसविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा- विनोद बंसल
अवकाळी पावसामुळे अर्धवट स्थितीत असलेले काम आणि कटाई केलेली डोंगराची माती घाटावरती आली आहे. यामुळे जी अवजड वाहने आहेत, ती फसली आहेत. जेसीबीच्या सहाय्याने घाटातील माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.