माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबई दि.०९ :- मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. महापालिकेतील उच्चशिक्षित आणि अभ्यासू नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. सोमवारी रात्री त्यांना अचानक अस्वस्थ जाणवू लागले. त्यांना तात्काळ व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा- विनोद बंसल

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली. २००२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडणूक आले. २००३ मध्ये शिक्षण समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर २००७ आणि २०१२ साली पुन्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले.

‘मोका’ चक्रीवादळामुळे राज्यातही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

८ मार्च २०१७ रोजी त्यांनी मुंबईच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारला. रामनारायण रुईया महाविद्यालयातून महाडेश्वर यांनी पदवी घेतली. त्यानंतर वडाळा येथील बीपीसीए महाविद्यालयातून व्यावसायिका पदव्युत्तर पदवी मिळविली. सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे ते माजी प्राचार्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published.