विस्टाडोम डब्यांमुळे मध्य रेल्वेला ८ कोटींहून अधिक महसूल
मुंबई दि.२८ :- मध्य रेल्वेवरील विस्टाडोम डब्यांमुळे मध्य रेल्वेला गेल्या सहा महिन्यांत ८ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. विस्टाडोम (पारदर्शक काचेचा डबा) जोडलेल्या सहा एक्स्प्रेसच्या डब्यातून ६६ हजार पर्यटकांनी प्रवास केला. मध्य रेल्वेवरील मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये विस्टाडोम डबा जोडण्यात आला.
निसर्ग गीतांवर आधारित ‘सृष्टीगान’ कार्यक्रमाचे आयोजन
नंतर मुंबई – मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला सप्टेंबर २०२२ मध्ये विस्टाडोम डबा जोडण्यात आला. प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन एक्स्प्रेसला जून २०२१, मुंबई – पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनला ऑगस्ट २०२१ आणि प्रगती एक्स्प्रेसला जुलै २०२२ मध्ये विस्टाडोम डबा जोडण्यात आला.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक २२६ इमारतींची यादी जाहीर; संकेतस्थळावर यादी उपलब्ध
काचेचे छत आणि लांब, रुंद खिडक्यांमुळे बाहेरील निसर्गाचे विलोभनीय दर्शन या डब्यातून घडते. नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या सहा महिन्यांत मध्य रेल्वेच्या विस्टाडोम डब्यांमधून सुमारे ६६ हजार प्रवाशांनी प्रवास केला. या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
