ठळक बातम्या

भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या पुणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई दि.२२ :- भारतीय मजदूर संघाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या (रविवारी) पुणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या शनिवार पेठ, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशचे माजी अध्यक्ष बाळासाहेब फडणवीस, माजी राष्ट्रीय महामंत्री ऊदयराव पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

दुपारी चार वाजता होणा-या या कार्यक्रमास भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री मोहन येणूरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला असून संजय मेनकुदळे यांचे प्रमुख भाषण होणार आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्यावतीने कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न, विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख, आंदोलने याची आदी माहिती देणा-या ‘कामगार संदेश’या डिजिटल मासिकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे.

कृषी योजनांचा निधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करा – राज्यपाल रमेश बैस

वीज उद्योगातील महाराष्ट्र राज्य कामगार महासंघातर्फे विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण उद्योगातील प्रतिरक्षा मजदूर संघातर्फे वृक्षारोपण कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघाच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *