म्हाडा कोकण मंडळाच्या २ हजार ४३५ घरांना प्रतिसाद नाही

मुंबई दि.१२ :- म्हाडा कोकण मंडळाच्या बुधवारी काढण्यात आलेल्या सोडतीत ४ हजार ६५४ पैकी फक्त २ हजार २१९ घरे विकली गेली आहेत. २ हजार ४३५ घरांना प्रतिसादच मिळू शकला नाही.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना राज्य शासनाचा दिलासा; आरोप आणि निलंबन मागे

या घरांसाठी अर्ज करण्यात आला नसल्याचे समोर आले असून यामध्ये मोठ्या संख्येने पंतप्रधान आवास योजना आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील विरार-बोळींजमधील घरांचा समावेश आहे. आता या घरांचा पुढील सोडतीत समावेश करण्यात येणार आहे.

दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील राष्ट्रीय उद्यान, दिंडोशी येथील पादचारी पूल सुरू

ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई येथील ४ हजार ६५४ घरांसाठी ४८ हजारांहून अधिक अर्जदार बुधवारच्या सोडतीत सहभागी झाले होते. मात्र यापैकी केवळ २ हजार २१९ जणांचे हक्काच्या घराचे स्वप्न सोडतीच्या माध्यमातून पूर्ण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.